Nashik BJP News: काकांवर पुतण्याची पत्रकाद्वारे टीका! भाजपमधील वाद चव्हाट्यावर

Letter drawn by Rajesh Adhaav
Letter drawn by Rajesh Adhaavesakal

Nashik BJP News : नाशिक रोड भाजपमध्ये सध्या धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपमधील पदाधिकारी असणाऱ्या पुतण्याने आपल्या २५ वर्षे नगरसेवक असणाऱ्या काकांवर चक्क पत्र काढले आहे.

हे पत्रक सोशल मीडियावर सध्या वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे. यातून एकाच प्रभागात काकाला खुले आव्हान पुतण्याने दिल्याची चर्चा नाशिक रोडमध्ये रंगत आहे. (Uncle Criticized by Nephew Controversy in BJP on rise Nashik BJP News)

भाजप महानगर सचिव राजेश आढाव हे गेली अनेक दिवसांपासून ‘माझ्या मनातलं’ अशा आशयाचा मजकूर लिहून सोशल मीडियावर व्हायरल करीत आहे. मात्र एक दिवसापूर्वी त्यांनी आपल्या राजकारणातील प्रतिस्पर्धी असणाऱ्या ज्येष्ठ नगरसेवक काकांचे नाव न घेता त्यांना खुला विरोध दर्शवला आहे.

पत्रात त्यांनी म्हटले आहे, की भ्रष्ट व स्वकेंद्रित कारभार यामुळे आज आपला प्रभागाची जी अवस्था झाली आहे, ती पाहता मागील २५ वर्ष वयाने ज्येष्ठ, वृत्तीने भ्रष्ट असणाऱ्या महाभागाने विकासाचे दिवे नक्की कुठे लावले आहेत याचा दुर्बीण घेऊन शोध घ्यावा लागेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Letter drawn by Rajesh Adhaav
Nashik Monsoon Rain: पावसाचा फक्त शिडकावा अन् शहरभर वाहतूक कोंडी!

पंचवीस वर्षात साधा पाण्याचा प्रश्न जो तथाकथित पुढारी सोडवू शकला नाही, तो पुन्हा गुडघ्याला बाशिंग लावून बसलेला पाहून तर संताप होतोच. पण त्यांची कीव करावीशी वाटते. जुना सूर्य अस्तास नेण्याची अन्‌ प्रभाग नव्या तरुण दमाच्या सुशिक्षित हातांना सोपविण्याची वेळ आली आहे.

यावरून भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. नगरसेवक होण्यासाठी काका पुतण्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच असल्याने आता थेट पुतण्याने नाव न घेता काकांवर काढलेले पत्रक सध्या लक्षवेधी ठरत आहे.

भाजप नाशिक रोड मंडल व नाशिक रोडमधील वेगवेगळ्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये या पत्रावर सध्या खुमासदार चर्चा रंगत आहे.

Letter drawn by Rajesh Adhaav
Nashik News: संरक्षक भिंत कामासाठी अतिक्रमण हटवा! ‘मेरी’ चे जिल्हाधिकारी, NMC आयुक्तांना साकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com