Under 15 National League Cricket : सिन्नरची सुहानी कहांडळ महाराष्ट्राची उपकर्णधार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suhani Kahandal

Under 15 National League Cricket : सिन्नरची सुहानी कहांडळ महाराष्ट्राची उपकर्णधार!

सिन्नर : भारतीय क्रिकेट नियमक मंडळांतर्गत मुलींच्या पंधरा वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात मूळची सिन्नरची व सध्या पुण्यात स्थायिक असलेली सुहानी भारत कहांडळ हिची निवड झाली. अष्टपैलू सुहानीकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोमवार (ता.२५)पासून रांची व जयपूर येथे खेळवल्या जाणाऱ्या नॅशनल लीगमध्ये ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. (Under 15 National League Cricket Sinnar Suhani kahandal is vice captain of Maharashtra nashik news)

हेही वाचा: Christmas Festival : नाताळसाठी सजल्या बाजारपेठा; सजावटीच्या वस्तूंना मागणी!

सुहानी मूळची कहांडळवाडी येथील आहे. तिचे वडील भारत कहांडळ पुण्यात नोकरीला आहेत. नववीत शिकणाऱ्या सुहानीने चार वर्षांपासून क्रिकेटचे धडे घ्यायला सुरवात केली. दोन वर्षांपासून ती पिंपरी चिंचवड येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या निवड चाचणीत ती पात्र ठरली.

तत्पूर्वी अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये तिने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली आहे. पंधरा वर्षांखालील मुलींच्या संघाच्या निवडीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून नाशिक येथे निमंत्रित खेळाडूंचे सामने नुकतेच खेळवण्यात आले. त्यात सुहानीने महाराष्ट्रातील संघात आपले स्थान पक्के केले.

हेही वाचा: Christmas Festival : नाशिक रोडला नाताळचा अभूतपूर्व उत्साह; 24 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कार्यक्रम