Christmas Festival : नाशिक रोडला नाताळचा अभूतपूर्व उत्साह; 24 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gavan (Nativity Scene) performed at Jail Road Saint Anna Mahamandir on Christmas.

Christmas Festival : नाशिक रोडला नाताळचा अभूतपूर्व उत्साह; 24 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कार्यक्रम

नाशिक रोड : नाशिक रोडला नाताळची तयारी पूर्ण झाली असून, ख्रिस्ती बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून चर्चमध्ये कार्यक्रमांना सुरवात होणार आहे. संत अण्णा महामंदिरात बिशप लुडर्स डॅनिअल २४ डिसेंबरला मध्यरात्री नाताळचा शुभसंदेश देणार आहेत. या वेळी फादर पीटर डिसूझा, फादर रॉबर्ट पेन आदी उपस्थित राहणार आहेत. २४ डिसेंबर रात्री दहाला नाताळ गीते, अकरा वाजता पवित्र मिसा होईल. (Unprecedented excitement of Christmas on Nashik Road Program from December 24 midnight Christmas Festival nashik news)

२५ डिसेंबरला सकाळी आठला फादर रॉबर्ट पेन, पीटर डिसूझा यांच्या उपस्थितीत पवित्र मिसा होईल. या वेळी प्रार्थना व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यासाठी संत अण्णा महामंदिर आणि बिशप हाऊस येथील साधक तयारी करीत आहे. उपनगर येथील सेंट झेवियर्स शाळेत बाळ येशू चर्चवर नाताळनिमित्त आकर्षक सजावट व रोषणाई केली आहे. ख्रिस्त जन्माचा देखावा साकारला आहे. फादर एरल फर्नांडिस यांच्या उपस्थितीत २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कार्यक्रम सुरू होणार आहेत.

मुक्तिधामसमोरील सेंट फिलिप चर्चमध्ये २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून आठवडाभर कार्यक्रम होणार आहेत. २४ डिसेंबरला मध्यरात्री कॅन्डल पेटविल्या जातील, २५ डिसेंबरला ख्रिस्त जन्मोत्सव व सणाची भक्ती, बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. नाशिक रोड परिसरात ख्रिस्ती बांधवांमध्ये अलोट उत्साह आहे. घरांवर आकाशकंदील लावले आहेत. चर्चमध्ये रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. चर्चबरोबरच इंग्रजी शाळांमध्ये ख्रिस्त जन्माचे देखावे केले आहेत.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News : 2 महिन्यातच सरपंचासह सदस्यांचे राजीनामे! कारण अद्याप गुलदस्त्यात!

"प्रत्येक नागरिकांनी सलोख्याने राहिले पाहिजे. सर्वांनी शांतीचे प्रतीक म्हणून विश्वकल्याणासाठी प्रार्थना करायला हवी. घरगुती आणि सांप्रदायिक हिंसाचाराचा नायनाट व्हायला हवा. या जगातील प्रत्येक मानवाच्या आयुष्यातील दुःख दूर होऊन बंधुभाव प्रेम आपुलकी जिव्हाळा निर्माण व्हायला हवा."- बिशप लुडर्स डॅनिअल, नाशिक कॅथलिक धर्मप्रांत

"विश्वशांतीसाठी सर्वच भाविक प्रार्थना करणार आहेत. नाताळची तयारी पूर्ण झाली असून मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रार्थना होणार आहे. सुवार्ता सांगण्यासाठी चर्चमधील ख्रिस्त मंडळ लोकांच्या घरी जाऊन त्यांचे दुःख दूर करीत आहे."- फादर रॉबर्ट पेन, संत अण्णा महामंदिर, जेल रोड

"जगाला शांती, करुणा, प्रेमाचा संदेश देण्यासाठी ख्रिस्ती बांधव प्रार्थना करीत आहोत. युद्धजन्य परिस्थिती नष्ट व्हावी आणि लोकांचे दुःख नष्ट व्हावे यासाठी प्रत्येक ख्रिस्ती बांधव प्रार्थना करीत असतात. या वर्षी चर्चमध्ये प्रार्थनेसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे."

- वॉल्टर कांबळे, समन्वयक, प्रिझन मिनिस्ट्री इंडिया, नाशिक.

हेही वाचा: Gram Panchayat Election : गोळवाडला 25 वर्षांनंतर निवडणूक; बिनविरोधची परंपरा खंडीत!