पारावरची शाळा, रेल्वेमध्ये ग्रंथालय; नाशिकमधील अनोखी शाळा चर्चेत

शिक्षणाच्या पारंपारिक पद्धतीला फाटा देत राबवला जातोय अभिनव प्रयोग
Expalier heritage school
Expalier heritage school

नाशिक : शिक्षणाच्या पारंपारिक पद्धतीला फाटा देत खास पद्धतीनं मुलांना शिकवण्यासाठी नाशिकमधील एका शाळेनं अभिनव प्रयोग राबवला आहे. या शाळेत मुलांसाठी झाडाखाली वर्ग भरवले जातात, या शाळेत गणवेशाचा कडक दंडक नाही तसेच शाळेचं ग्रथांलय ट्रेनच्या आकारात साकारण्यात आलं आहे. लहान मुलांसाठी खास रचनात्मक पद्धतीचं शिक्षण सुरु केलं आहे.

Expalier heritage school
'बळीचा बकरा शोधू नका', निलोफर मलिकचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर

'इस्पालिअर हेरिटेज स्कूल' असं या शाळंच नाव असून या शाळेचे मुख्याध्यापक सचिन जोशी एएनआयशी बोलताना म्हणाले, पारंपारिक पद्धतीनं शिक्षण देण्याचा पायंडा तोडणे हे या शाळेचं व्हिजन आहे. या शाळेची उभारणीच अशा पद्धतीनं करण्यात आली आहे की ज्यामुळे मुलांना स्वतःहून शाळेत यावंस वाटेल." अनोख्या ट्रेन लायब्ररीबाबत सांगताना जोशी म्हणाले, जपानी भाषेतील एका पुस्तकातील शाळेच्या वर्णनातून आम्हाला आमच्या शाळेच्या उभारणीसाठी प्रेरणा मिळाली. टोट्टो-चॅन हा खूपच सुंदर पुस्तक असून ज्यामध्ये जपानधील शाळा या ट्रेनमध्ये भरत असे. आम्ही ही कल्पना तंतोतंत अंमलात आणलेली नाही. पण यातून प्रेरणा घेऊन आम्ही अनोख्या पद्धतीनं ट्रेन लायब्ररी तयार केली आहे.

Expalier heritage school
"ज्याला वजन नाही त्याला...."; मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

शाळेचा अष्टपैलू अभ्यासक्रम

अभ्यासक्रमाच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश टाकताना जोशी त्यांच्या शाळेतील शिक्षण पद्धतींचे नियम आणि प्रकार स्पष्ट केले. ते म्हणाले, "आमच्या अभ्यासक्रमात झाडांच्या खाली बाहेरच्या वर्गखोल्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना गणवेश नाही, आमच्याकडे शेततळे आहेत जिथे मुले शेती करतात, आमच्याकडे एक सायन्स पार्क देखील आहे जे व्यावहारिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी बांधलं गेलं आहे. त्याचबरोबर नाटकावर आम्ही विशेष भर देत आहोत. आमच्याकडे अॅम्फी थिएटर, इन-हाउस रेकॉर्ड स्टुडिओ आहेत आणि ७० टक्क्यांहून अधिक अभ्यासक्रम संगीतात रूपांतरित केला आहे"

Expalier heritage school
राकेश बापटला तातडीने काढलं 'बिग बॉस'च्या घराबाहेर; कारण...

लहान मुलांचा मेंदू विकसित होतो त्याप्रमाणं शिक्षण

या विशेष शिक्षणाचं आणि अभिव्यक्ती शिक्षणाचं महत्व सांगताना जोशी म्हणाले, "सुरुवातीची दहा ते बारा वर्षे जेव्हा लहान मुलाचा मेंदू पूर्णपणे विकसित होत असतो. म्हणूनच त्याला उत्तेजित करणे आणि सकारात्मक प्रतिमा तयार करणे आणि विधायक मानसिकता निर्माण करणे महत्त्वाचे असते. गटशिक्षण, रात्रशाळा आदी उपक्रमही शाळेत वापर केला जात आहे. अभ्यासक्रमाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की जवळजवळ प्रत्येक पंधरा मिनिटांनी मुलांना मनोरंजनासाठी विश्रांती घेता येईल आणि अतिरिक्त क्रिडा प्रकारांचा आनंद घेता येईल.

शाळेला बंधनकारक नियम नाहीत

आमच्या शाळेत इतर शाळांप्रमाणे मुलांसाठी बंधनकारक असे नियम नाहीत. त्याशिवाय, मुलं डेस्क आणि बेंचऐवजी जमिनीवर बसतात. गणवेश हे मुलांच्या क्षमतांवर मर्यादा घालतात आणि त्यांना मर्यादित करतात, असं आमचं मत आहे. त्यामुळे आमच्या शाळेत गणवेश नाहीत. मुलांना शिक्षा करणं यावर आमचा विश्वास नाही. त्याऐवजी आम्ही त्यांना 30 मिनिटे सायकल चालवण्यास सांगतो. ज्याचा फायदा असा होतो की त्यामुळं वीज निर्माण होते. आम्ही मड पार्टीचंही आयोजन करतो जिथं मुलं एकमेकांसोबत तसेच शिक्षकांसोबत खेळू शकतात. कोणीही आमच्या शाळेत शिक्षकांना सर किंवा मॅडम असं संबोधत नाहीत तर त्यांना 'भैया-दीदी' असं संबोधलं जातं, असं यावेळी मुख्याध्यापक सचिन जोशी यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com