विकसित भारतासाठी युनियन बँकेचे योगदान : भगवान बागुल

विकसित भारतासाठी युनियन  बँकेचे योगदान : भगवान बागुल
Published on: 
16228 मालेगाव : युनियन बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी बोलताना पत्रकार भगवान बागुल, समवेत बँकेचे व्यवस्थापक नितीन महेशकर ----- विकसित भारतासाठी युनियन बँकेचे योगदान : भगवान बागुल सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. १३ : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हस्ते १०८ वर्षापूर्वी उद्‌घाटन झालेल्या युनियन बँक ऑफ इंडियाची ऐतिहासिक प्रगती झाली आहे. देशात ८ हजार ७०० शाखांचा विस्तार आहे. बँकेचे देश विकासातील योगदान लक्षणीय ठरले आहे. देशात सर्वात आधुनिक व प्रगत तंत्रज्ञान, ग्राहकाभिमुख सेवा, व्यवस्थापनातील कौशल्य यामुळेच ही बँक जनादराचा विषय ठरल्याचे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य भगवान बागुल यांनी येथे केले. येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे व्यवस्थापक नितीन महेशकर होते. श्री. बागुल म्हणाले, की देशातील सर्व शाखांमध्ये शंभर टक्के कोअर बँकिंग सोल्युशन असलेली देशातील पहिली बँक ठरली आहे. मालेगाव शाखेत सर्वच स्तरातील ग्राहकांना चांगली व तत्पर सेवा मिळत आहे. सौजन्यपूर्ण वागणूक, आपुलकीची भावना ग्राहकांना मिळत असल्याने शहरात बँक अग्रणी ठरली आहे. बँक व्यवस्थापक महेशकर यांनी शाखेची प्रगतीकडील वाटचाल स्पष्ट केली. दीपाली देवकर यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.