Unity in Diversity : जय हरी विठ्ठल, अल्लाहू अकबर स्वरांनी शहर निनादले

Viral images conveying the message of unity on social media.
Viral images conveying the message of unity on social media.esakal

जुने नाशिक : ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’, ‘अल्लाहू अकबर’ या स्वरात बकरी ईद (bakari Eid) आणि आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) शहरात उत्साहात साजरी झाली. दोन्ही पवित्र सण एकाच दिवशी येणे हा केवळ योगायोग नसून देव आणि अल्लाचा एक संकेत आहे.

‘आता तरी डोळे उघडा आणि पाहा आम्ही दोघे एकच आहोत. ‘आम्ही एकमेकांमध्ये भेद नाही केला, तर तुम्ही धर्माच्या नावावर जाती-धर्मात तेढ निर्माण करून आमच्यात का फूट पाडत आहात’, अशा प्रतिक्रिया यानिमित्त मिळाल्या. (Unity in Diversity ashadhi ekadashi with bakari eid indian festival latest marathi news)

सध्या देशात जात धर्माच्या नावावर प्रचंड अराजकता वाढली आहे. मनुष्य द्वेषाच्या आहारी जात आहे. काही समाजकंटक जात, धर्माच्या नावावर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही तर देशाची किंवा राज्याची संस्कृती नाही.

आजही साता समुद्रपलीकडे आपल्या संस्कृतीचा बोलबाला आहे. सध्याची परिस्थिती त्यास काळीमा फासणारी ठरत आहे, म्हणूनच नियतीने ‘बकरी ईद आणि आषाढी एकादशी’, असे दोन्ही पवित्र सण एका दिवशी आणून समाजाला संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वधर्मसमभाव हीच आपली संस्कृती आहे आणि ती तेव्हाच टिकेल जेव्हा सर्वजण एकोप्याने, सलोख्याने नांदतील.

Viral images conveying the message of unity on social media.
गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात होणार तब्बल 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग

जुने नाशिक परिसराचा विचार केला, तर मुस्लिम बहुल भागात एकमेव विठ्ठल मंदिर आहे. वर्षानुवर्षांपासून या मंदिरात पूजाविधी, धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे होतात. संत निवृत्तीनाथांची पालखी याठिकाणी येते. त्याचा कधीही येथील मुस्लिम बांधवांना त्रास झाला नाही. जुलूस, ईद, असे विविध मुस्लिम धार्मिक कार्यक्रमांचा मंदिराशेजारी राहणाऱ्या हिंदू बांधवांना त्याचा कधी त्रास झाला नाही.

रविवारी (ता. १०) काजीपुऱ्यातील विठ्ठल मंदिरात सकाळपासूनच ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असे भजनाचे स्वर आणि पूजाविधीचे मंत्र कानावर पडत होते, तर दुसरीकडे परिसरातील मशिदींदमध्ये ईदनिमित्त नमाजाचे ‘अल्लाहू अकबर’, असे दोन्ही स्वर एकाच वेळी हिंदू आणि मुस्लिम बांधवांना ऐकावयास मिळाले.

Viral images conveying the message of unity on social media.
Corona Update : जिल्ह्यात 80 पॉझिटिव्‍ह, 58 रुग्‍ण कोरोनामुक्‍त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com