Nashik News : 2 महिन्यातच सरपंचासह सदस्यांचे राजीनामे! कारण अद्याप गुलदस्त्यात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Resignation

Nashik News : 2 महिन्यातच सरपंचासह सदस्यांचे राजीनामे! कारण अद्याप गुलदस्त्यात!

घोटी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या थेट सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी राजीनाम्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Resignation of elected members including Sarpanch within 2 months at karhole grampanchayat election Nashik News)

तालुक्यातील कऱ्होळे येथील निवडणूक १६ ऑक्टोबर रोजी परिवर्तन पॅनल विरोधात प्रगती पॅनल थेट सरपंचासह सदस्य निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. अवघ्या तीन मतांनी या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे शैलेश खातळे यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

गावात मागील दहा वर्षांपासून प्रगती पॅनलची सत्ता गावात होती. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावण्याची मागणी करताच सरपंचासह, उपसरपंच सदस्य यांनी राजीनामे देत सत्तेतून माघार घेतली आहे. राजीनामा दिलेल्यामध्ये सरपंच अशोक आघान, उपसरपंच आशाबाई खातळे, सदस्य मंदाबाई लावरे, लताबाई आघान, अंकुश आघान यांचा समावेश आहे. अवघ्या दोन महिन्यात सरपंचासह इतरांचे राजीनामे इगतपुरी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच घडल्याचे राजकिय जाणकारांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News : ‘ती'च्या मृत्यूने कातकरी बालकांची वेठबिगारीतून मुक्तता!

शैलेश खातळे यांनी सदर निवडणूक अत्यंत प्रतिष्ठित केल्याने व गावातील अडाणी लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा सत्ताधारी यांनी घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत जर त्यांनी भ्रष्टाचार केलेला नसेल तर राजीनामा देण्याची गरज काय होती ? असेही तर्क वितर्क चौकाचौकात लावले जात आहे.

"मी उच्चशिक्षित असून गावाचा विकास करण्यासाठी मी पूर्ण वेळ देणार आहे. जे निवडून आले त्यांना माहीत आहे, भ्रष्टाचार उघड होणार म्हणून राजीनामे दिलेले आहे. यामध्ये बाहेरील राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप झाल्याने निवडणूक चुरशीची झाली व गावात अशांतता पसरली. फेर निवडणूक झाल्यास संपूर्ण पॅनल निवडून आणू."- शैलेश खातळे, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा: Nashik Crime News : मोपेड चोरट्यांना 2 महिन्याचा कारावास