आजपासून मिळणार रेल्वेचे अनारक्षित तिकीट | Railway general ticket | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Railway Ticket

आजपासून मिळणार रेल्वेचे अनारक्षित तिकीट

कोरोना (Corona) महामारीमुळे गेल्या सव्वा दोन वर्षांपासून रेल्वेत सर्वसामान्य श्रेणीच्या तिकिटावरील (Railway general ticket) प्रवास रेल्वेने बंद केला होता. आता बुधवार (ता. २९)पासून पुन्हा रेल्वेतर्फे जनरल तिकिटावर प्रवास सुरू करण्यात येत आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सुखद घटना ठरणारी आहे.

कोरोनाकाळात सर्वच रेल्वे बंद होत्या. पहिल्या लाटेनंतर रेल्वेने ठराविक रेल्वे सुरू केल्या. त्यातही मास्कची सक्ती, कोरोना टेस्टिंगची सक्ती होती. सोबतच फक्त आरक्षित (रिझर्व्हेशन) तिकिटावरच प्रवास करण्यास सांगण्यात आले होते. कोरोना संसर्गाचे नियम पाळून हा प्रवास होता. रेल्वेत ए.सी. डब्यात बेडशीट, चादरी पुरविणे रेल्वेने बंद केले होते. कालांतराने काही ठराविक मेल, एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाल्या. पॅसेंजर गाड्या बंदच होत्या. त्यातही प्रवाशांना तिकिटाचे आरक्षण करूनच प्रवास करता येत होता. जनरल तिकीट दिले जात नव्हते. सर्वसामान्य श्रेणीने प्रवास करणाऱ्यांना यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. यामुळे पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
आता काही ठराविक पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या आहेत. एक्स्प्रेस मेल गाड्याही वाढू लागल्या आहेत. यामुळे जनरल तिकीट देण्यास रेल्वे बुधवारपासून सुरवात करणार आहे.


हेही वाचा: अस्तित्व टिकविण्याचे शिवसेनेसमोर आव्हान!

UTS ॲपद्वारे जनरल तिकीट
भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर अनारक्षित तिकिटे देण्यात येतील. अनारक्षित तिकीट बुकिंग सुविधा रेल्वे प्रशासनाद्वारे काही निवडक स्थानकांवर एटीव्हीएम आणि यूटीएस ॲपद्वारे प्रवासी आपले तिकीट बुक करू शकतात. या सुविधांमुळे त्यांचा वेळ वाचण्यात मदत होईल.
गर्दीत उभे राहून वेळ घालविण्यापेक्षा प्रवाशांना आता ॲपद्वारे जनरल तिकीट काढता येणार आहे.

ATVM सुविधा असलेली रेल्वेस्थानके
- जळगाव, भुसावळ, मनमाड, नाशिक, बऱ्हाणपूर, खंडवा, मलकापूर, शेगाव, अमरावती.

हेही वाचा: Jalgaon : पेट्रोलपंपाच्या मॅनेजरने लावला मालकाला चुना

''भुसावळ विभागात उद्यापासून जनरल (अनारक्षित) रेल्वे तिकीट देण्याची सुविधा सुरू होत आहे. अनेक प्रवाशांची जनरल तिकीट सुरू करण्याची मागणी होती. ती रेल्वे प्रशासनाने पूर्ण केली आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.'' - जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी,
रेल्वे भुसावळ विभाग

Web Title: Unreserved General Train Tickets Starts After 2 Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..