Agriculture Loss
sakal
नाशिक: जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीपिकांना फटका बसला. जिल्ह्यात १९ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत हजेरी लावलेल्या पावसामुळे ४८ हजार ३२४ हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मका, सोयाबीन, भात, कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. त्यामुळे एक लाख आठ हजार ५३१ शेतकरी बाधित झाले आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने यंत्रणांना पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत.