Nashik Unseasonal Rain Damage: अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे कांदा लागवडीसाठी एकराला 15 हजारांचा खर्च

onion
onionesakal

Nashik Unseasonal Rain Damage : उन्हाळी कांद्याच्या रोपांना अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे आता कांद्याच्या लागवडीचा खर्च एकराला १३ ते १५ हजार रुपयांपर्यंत पोचला आहे.

रोपांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना दाही दिशांना वणवण करावी लागत आहे. ज्या शेतकऱ्यांनी मेहनतीने रोपे वाचविली आहेत, अशा रोपांची विक्री सुरू आहे. (Unseasonal Rain Damage 15 thousand per acre for onion cultivation nashik news)

बहुतांश शेतकऱ्यांची रोपे खराब झाल्याने त्यांची यंदाच्या हंगामासाठी सारी मदार विकतच्या रोपांवर आहे. यंदा उन्हाळी कांद्याची रोपे दिवाळीनंतर तरारली होती. त्यानंतरच्या अवकाळी पाऊस आणि धुक्याने रोपांची वाट लावली.

त्यामुळे बाजारातून महागडे बियाणे विकत घेऊन त्याची रोपे टाकली. लागवडीसह निंदणी, औषधांच्या फवारणीचा खर्च वाया गेला आहे.

onion
Nashik Onion Crisis: उन्हाळ कांदा 1100 रुपयांनी घसरला! लासलगावला शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या निर्यातबंदीचा फटका

दिवाळीच्या आसपास रोपे चांगली असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांचा वापर रोपांसाठी केला नव्हता. परिणामी, आता विकतच्या रोपांसाठी शेतकऱ्यांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

पाऊस कमी झाल्याने विहिरींच्या पाण्याची शाश्‍वती नाही. त्यामुळे कांद्याची लागवड कमी झाली आहे. देवळा भागातील एका शेतकऱ्याने पहाटे सोशल मीडियातून रोपे विकण्याचा ‘मेसेज' पाठवला होता. काही वेळात त्यांची रोपे विकली गेली. रोपांची वानवा असल्याने नात्यातून रोपे मिळणे मुश्‍कील बनल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

onion
Nashik Onion Purchase: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’ची खरेदी देखावाच! केंद्राची जाहिरात, मात्र दोनच केंद्रे सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com