सणासुदीत शेतीला अवकाळीचा मोठा फटका; शेतकरी हवालदील

unseasonal rain damages crops
unseasonal rain damages cropsesakal

नाशिक : दोन वर्षाच्या लॉकडाउन (Lockdown) आणि गुलाब (Gulab Cyclone) चक्रीवादळाच्या पावणे दोन लाख हेक्टरवरील दणक्यातून शेतकरी सावरत नाही तोच, ऐन दिवाळीच्या आनंदोत्सवावर पावसाने पाणी फिरविले. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी आलेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान केले. पश्चिम पट्ट्यातील भात पीक आणि भाजीपाल्याच्या नगदी पिकांना शुक्रवारच्या पावसाचा फटका बसला आहे.

ऐन सोंगणीला आलेल्या भाताच्या पीकात पावसाचे पाणी

पश्चिम पट्ट्यात सध्या भाताच्या सोंगणीची कामे सुरु आहे. इगतपुरी-नाशिक- त्र्यंबकेश्वर-सिन्नर या तालुक्याच्या सिमावर्ती भागात भात पीक झोडपणीसाठी जमा करुन ठेवलेली आहे. भात पिकाशिवाय टोमॅटो, मिरची, काकडी, फ्लॉवर सह पालेभाज्या पिकविणारी ही गाव आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या तासाभराच्या पावसाने कापून ठेवलेला भात, सोंगणीच्या प्रतिक्षेतील पीकांचे नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
हवामान विभागाने पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार काल पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यासह पश्चिम पट्ट्यातील तालुक्यात पावसाने हजेरी लावली. सोंगणीला आलेल्या भात पिकात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे भाताचे नुकसान झाले. याशिवाय टोमॅटोसह पालेभाज्याच्या नगदी पिकांचे नुकसान झाले. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.
दोन वर्षाच्या लॉकडाउननंतरच्या आनंदोत्सवावर पावसाने पाणी फिरले आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवाचा आनंद घेण्याऐवजी पश्चिम पट्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना शेतीचे पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागले.

unseasonal rain damages crops
मनमाड : तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

६७४ गावांना दणका

सप्टेंबर महिन्यात गुलाब चक्रीवादळाचा जिल्ह्याला मोठा दणका बसला. गुलाब चक्रीवादळाने सुमारे १ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना दणका बसला. त्या नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाने १४७ कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. जिल्हयातील ४३ महसूल मंडळातील मालेगाव, नांदगाव, दिंडोरी, निफाड तालुक्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. मका, कांदा, कापुस, सोयाबीन, ज्वारी, भाजीपाला, द्राक्ष, डाळींब, द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. मदतीसाठी १४७ कोटी २१ लाख रूपयांच्या अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाची मागणी प्रलंबित असतांना कालपासून पून्हा चार दिवसांच्या अवकाळीची टांगती तलवार आहे. ६७४ बाधीत गावांतील २ लाख २४ हजार ९१९ शेतकऱ्यांचे १ लाख ७१ हजार ८६७ क्षेत्रावरील नुकसानीनंतर पून्हा महिन्यातच पुन्हा दणका बसल्याने शेतकऱ्यांचा दिवाळीचा आनंद हिरावला गेला आहे.


तयार भात पीक आडवं

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली क्षेत्र मंडलात काही भागात मुसळधार पावसाने भात पीक आडवी झाली. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले पीक शेतात भुईसपाट झालेली पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. तुलनेने इतर तालुक्यात पावसाचा जोर कमी होता. पण त्यामुळे पालेभाज्यांसह नगदी पीकांचे नुकसान झाले. नाशिक तालुक्यात भाजीपाला पिकांचे क्षेत्र चांगले असून नेमक्या दिवाळीच्या मोसमात जरा कुठे बरे भाव मिळू लागले असतांनाच पावसाने दाणादाण उडविली. शुक्रवारी सायंकाळी सुरु झालेल्या पाउस इगतपुरी नाशिक सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागात मुसळधारपणे बरसला. सायंकाळी दीड तासाहून अधिक काळ वीजपुरवठा खंडीत झाला होता.

unseasonal rain damages crops
कणीक मळून घेतल्यावर काळं पडतयं? या टिप्स फॉलो करुन ठेवा फ्रेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com