Unseasonal Rain : ‘अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करा’ माजी सरपंचाची मागणी

unseasonal rain govt should help farmers by making Panchnama of damaged crops immediately
unseasonal rain govt should help farmers by making Panchnama of damaged crops immediately esakal

नगरसूल (जि. नाशिक) : नगरसूल व परिसरात रविवार व सोमवारी झालेल्या बिगरमोसमी (Unseasonal Rain) पाऊस व तुरळक गारपिटीने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू, कांदा, हरभरा आदी पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. (unseasonal rain govt should help farmers by making Panchnama of damaged crops immediately nashik news)

वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेले कांदा पीक व काढणी करून शेतात पोळ करून साठविलेला लाल कांदाही भिजला. मेहनतीने पिकविलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानग्रस्त पिकांची तातडीने पाहणी करून मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

unseasonal rain govt should help farmers by making Panchnama of damaged crops immediately
Water Supply : सिन्नरकरांना दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा होणार

दरम्यान ‘आधीच शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यातच अवकाळी पाऊस व गारपिटीने उरलेसुरले पीकही उद्धवस्त झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी माजी सरपंच सुभाष निकम यांनी केली आहे.

unseasonal rain govt should help farmers by making Panchnama of damaged crops immediately
Crop Crisis : वांगी पिकावर फिरवला रोटर; बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हताश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com