Unseasonal Rain : काटवन भागातील गारेगाव परिसरात गारपीट; कांदा अन् पोल्ट्री फार्मचे नुकसान

Damaged Poultry farmer
Damaged Poultry farmeresakal

Unseasonal Rain : मालेगाव तालुक्यातील काटवन भागात शनिवारी (ता.८) सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या अवकाळी पाऊस व वादळ, गारपिटीसह वा-याने मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. वादळ वा-याने विज वितरण पोल कोसळले असुन मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडले आहेत.

त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी वस्तीवरील रस्त्यावर झाडं पडल्याने शेतकऱ्यांनी स्वतः रस्त्यावरील झाडे बाजूला केले. या अचानक आलेल्या वादळात मळ्या खळ्यात राहणा-या शेतकऱ्यांच्या घरांचे पत्रे उडून संसार उघड्यावर आला. (Unseasonal Rain Hailstorm in Garegaon area of ​​Katwan area Damage to Onion and Poultry Farm nashik news)

काटवान भागातील गारेगाव व वाघखोरे वस्ती व वळवाडे या परिसरात वादळासह गारपीट झाली. अनेक पोल्ट्री फार्मचे पत्रे उडाले. यामध्ये पाचशेच्या वर पक्ष्यांचे नुकसान झाले. गारपीट एवढी तुफान होती की अनेक घरांसह पोल्ट्रीचे शेडसह, वाघखोर वस्ती परिसरातील बाळू मामा मंदीराचे शेड उडाले आहे.

शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांदा असुन गारपिटीने कांदा झोपल्याने अवकाळीच्या संकटाने आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांचं कंबरडे मोडले आहे. गारेगावच्या वाघखोरे वस्ती भागात भिला गोवेकर यांच्या घराचे पत्र उडाल्याने धान्यासह संसारोपयोगी साहित्य पावसात भिजले असुन डोक्यावरचे छप्पर उडाल्याने संसार उघड्यावर आला आहे. विलास बोरसे यांच्या पोल्ट्रीचे पत्रे उडाल्याने पाचशेच्या वर पक्षांचे नुकसान झाले.

गारेगाव येथील अशोक देसले, आशा बोरसे ,सदाशिव पाटील ,सागर कोर, केदा जाधव, वळवाडे परिसरातील भगवान गोवेकर, भाऊसाहेब हाके यांच्या घरांचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे समजते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Damaged Poultry farmer
Dhule Unseasonal Rain : पिंपळनेरसह परिसरात अवकाळी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com