Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस बरसला, शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावला

Unseasonal Rain Nashik
Unseasonal Rain Nashik esakal

Unseasonal Rain Nashik : रविवारी ( ता.९) संध्याकाळी विजेच्या गडगडासह नाशिक (Nashik News) जिल्ह्यात गारांचा अवकाळी पाऊस बरसला. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतात काढून ठेवलेले कांदा पीक झाकण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ उडाली. (unseasonal rain nashik with hail nashik news)

नाशिक जिल्ह्यात सिन्नर, नांदगाव, नांदूर, खेडलेझुंगे गावात आज संध्याकाळी मेगगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसला. यात रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

सिन्नरमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

सिन्नरच्या पूर्व भागात, देवपूर गावात अवकाळी पाऊस बरसला. मालेगाव औद्यागिक वसाहतीतील शेतात गारांसह पाऊस बरसला. शेतातील कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिलं झाला आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Unseasonal Rain Nashik
Unseasonal Rain : बागलाण, मालेगावला अवकाळीचा तडाखा; बळीराजा हवालदिल!

नांदगावला गारांसह अवकाळीचा फटका

नांदगाव तालुक्यात लक्ष्मीनगरला,आझादनगर ला अवकाळी पाऊस बरसला. शेतकरी ग्रामस्थ तुफान पावसामुळे भयभीत झाले आहेत.

चांदवड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी

चांदवड तालुक्यात आज आठ वाजून वीस मिनिटांनी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रेडगाव कोलटेक पाटील साळसाने वाहेगाव साळ काजी सांगवी सोनी सांगवी आधी गावांना पावसाने जोडपले जोडपले आहे. काढणीला आलेल्या कांदा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.विंचूर, खेडलेझुंगे, निवाणे गारांसह अवकाळी पाऊस बरसला. कांदा पिकासह मिरची टोमॅटो कलिंगड पिकांचे नुकसान झाले आहे.

Unseasonal Rain Nashik
Nashik News : द्राक्षउत्पादकांना बेदाण्याचा आधार! भाव गडगडल्याने मोठी हानी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com