Nashik Monsoon
sakal
नाशिक: शहर-परिसरात आठवड्याच्या पहिल्या दिवशी (ता. २७) अवकाळीने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी झालेल्या पावसाने सर्वसामान्य नाशिककरांचे हाल झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. या अवेळी पावसामुळे पिके धोक्यात आली आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.