नाशिक- गेल्या आठवड्यात म्हसरूळ हद्दीतील परप्रांतीय कंटेनरचालकाचा खून झाल्याची घटना घडली. मात्र अद्यापही संशयितांचा शोध लागू शकलेला नाही. तर, गेल्या दीड वर्षात तीन खुनाच्या गुन्ह्यांची उकल होऊ शकलेली नाही. यातील दोन म्हसरूळ हद्दीतून असून, एक पंचवटीच्या हद्दीतील गुन्हा आहे.