Nashik : उंटवाडीचे Slaughter House वर्षानुवर्षे बंदच!; NMCचा महसूल पाण्यात

Slaughter House at Untwadi.
Slaughter House at Untwadi.esakal

सिडको (जि. नाशिक) : महापालिकेकडून सिडकोतील उंटवाडी येथे मास विक्रेत्यांसाठी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वी कत्तलखान्याची निर्मिती करण्यात आली होती, मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून लिलाव प्रक्रिया होत नसल्याने कत्तलखान्याचे पाच ते सहा गाळे वापराविनाच पडून आहे.

यामुळे गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल वाया गेला आहे. एकीकडे मास विक्रेत्यांना विक्रीसाठी मुख्य रस्त्यांवर खुल्या जागेत परवानगी दिली जात असल्याने महापालिकेच्या कत्तलखान्यातील गाळे रिकामे पडून असल्याचा आरोप जागृत नागरिकांकडून करण्यात आलेला आहे. (Untwadi Slaughter house been closed for years Nashik Latest Marathi News)

मास विक्रेत्यांसाठी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या हद्दीत उंटवाडी येथे १५ ते २० वर्षापूर्वी ६ ते ७ कत्तलखाने उभारण्यात आले. मास विक्री करणे हा उद्देश लक्षात ठेवून हा कत्तलखाना बांधण्यात आला होता. मात्र अनेक वर्षांपासून या कत्तलखान्यातील गाळे धूळखात तसेच बंद अवस्थेत असल्याने या गाळ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या यामुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल वाया गेला आहे. २०१९ मध्ये मनपाने या गाळ्यांचा लिलाव काढला होता, मात्र यानंतर कदापी लिलाव न काढल्याने गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी कोणीही फिरकले नाही. सदर गाळे हे अवैध धंद्यांचा हॉटस्पॉट बनले आहेत. या ठिकाणी अनेक मद्यपी तरुणांचा वावर वाढला आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी एका चायनीज विक्रेत्याचा खून झाला होता. मनपाच्या मालकीच्या जागेत गैरप्रकार सुरू असल्याने या कत्तलखान्यातील गाळ्यांचा तत्काळ लिलाव करावा व मास विक्रेत्यांना विक्रीसाठी गाळे कार्यान्वित करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी मनपा आयुक्त, तसेच वैद्यकीय पशुविभाग व विभागीय अधिकाऱ्यांनी तत्काळ लिलावाची प्रक्रिया काढली पाहिजे. म्हणजेच गेल्या पाच ते सहा वर्षांपासून बुडत असलेला महापालिकेचा महसूल पुन्हा सुरू होऊन महापालिकेच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल यात शंकाच नाही.

Slaughter House at Untwadi.
Nashik Lok Sabha Elections : लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी; भाजपकडून अनेक मोठी नावे चर्चेत

फेरलिलाव गरजेचे

*उंटवाडीचे स्लॉटर हाऊस गेल्या पाच ते सात वर्षापासून धुळखात

* मनपाचे लाखो रुपयांचे उत्पन्न वाया

*स्लॉटर हाऊस बनले मद्यपी, अवैध धंद्यांचा अड्डा.

* मनपा प्रशासन अधिकाऱ्यांचे लिलावाकडे दुर्लक्ष

* गाळ्यांचे शटर, लॉक, खिडक्या तुटलेले

* लिलाव प्रक्रियेबाबत दर तीन महिन्यांनी फेरलिलाव प्रक्रिया करणे गरजेचे आहे

Slaughter House at Untwadi.
Nashik : रामकुंड नव्हे...रामतीर्थ!; ‘रामतीर्थ'वरील मंदिरांचे जपावे पावित्र्य!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com