
Nashik News : अतिरिक्त गुणांसाठी प्रस्तावाची 23 पर्यंत संधी; मुदतवाढीचा निर्णय
नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षांना प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण दिले जात असतात. हे गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत वाढविली आहे.
त्यानुसार आता विद्यार्थ्यांना २३ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करता येतील. (Up to 23 opportunities to offer for extra marks Decision on extension of time Nashik News)
हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?
हेही वाचा: Nashik News : पोलिस भरतीत 40 टक्के तरुणांची दांडी आजअखेर साडेपाच हजार उमेदवार पात्र
शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला याबाबत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ दिलेला असल्याचे मंडळाने कळविले आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत होती.
तर, शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत दिलेली होती. कला संचालनालयातील कला संचालक यांनी दिलेल्या माहितीनुसार एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धेचा २०२२ चा निकाल १६ जानेवारीला जाहीर केला जाणार आहे.
यामुळे शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव स्वीकारण्याच्या मुदतीत वाढ करण्याबाबत विनंती केलेली होती. त्याआधारे मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना आता २३ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करता येणार आहे. तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याची वाढीव मुदत ३१ जानेवारीपर्यंत असेल.
हेही वाचा: Nashik News : आम्ही खेळायचं कुठं? वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष