esakal | राज ठाकरे पुन्हा मैदानात! आगामी निवडणुकांत 'हा' गड काबीज करण्यासाठी लक्ष्य
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray

राज ठाकरे पुन्हा नाशिकच्या मैदानात! कृष्णकुंजवर बैठक

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या (muncipal election) तयारीचा भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी पुणे पाठापोठ नाशिककडे लक्ष केंद्रीत केले आहे. आज (ता.8) शहरातील सहा विभाग अध्यक्षांची बैठक घेवून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेताना पदाधिकाऱ्यांना थेट संवाद साधण्यासाठी स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक देत विभाग अध्यक्ष व पक्षाध्यक्ष या दोघांमधील संपर्काचा स्तर मोडीत काढला.

राज ठाकरेंचा थेट संपर्क साधण्याच्या सुचना

राज ठाकरे यांनी दोन दिवसांपुर्वी पुणे शहराचा दौरा करून मनसे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यापाठोपाठ सोमवारी अचानक पदाधिकायांना कृष्णकुंजवर बोलाविण्याचे निरोप आले. मंगळवारी (ता. ७) सकाळी दहा वाजता जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष तसेच सहाही विभाग अध्यक्षां सोबत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणी व शाखा अध्यक्षांच्या नेमणूकी संदर्भात चर्चा केली. शहरातील सहा विभाग अध्यक्षांशी वन टू वन चर्चा केली. त्याचवेळी विभाग अध्यक्षांना स्वतःचा व्यक्तिगत भ्रमणध्वनी क्रमांक देताना थेट संपर्क साधण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर अन्य पदाधिकारी व विभाग अध्यक्षांशी संयुक्त बैठक घेत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या.

संघटनेत बदलाचे संकेत

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटनेत शाखाध्यक्षांच्या नियुक्त्या करतं असताना वरिष्ठ पातळीवर देखील बदल होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला निवडणुकीत सामोरे जाताना आक्रमक चेहरा शोधला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शाखा अध्यक्ष नेमणुका चर्चा, सहा विभागात वन टू वन भेटले. स्वताचा मोबाईल दिला. २१ ला अमित ठाकरे येणार, २२ ला राज स्वता येणार, अन्य नियुक्त्या करणार, २३ तारखेला विभाग सहा अध्यक्षांचा मेळावा होईल.

हेही वाचा: येवल्यात परंपरा खंडीत करुन शेतमालाचे लिलाव

महिनाअखेरीस दौरा

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा संघटना बांधणीसाठी नाशिकला येत आहे. त्यांनी स्वताहून प्रोग्राम दिला. २१ ते २३ सप्टेंबर असा दौरा राहील. २१ सप्टेंबरला अमित ठाकरे व पक्षाचे प्रमुख नेते दौयाची तयारी करण्यासाठी दाखल होतील. २२ सप्टेंबरला नवीन शाखा अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर होतील. २३ सप्टेंबरला सहाही विभागाचे विभाग अध्यक्ष व शाखा अध्यक्षांचा एकत्रित मेळावा होईल. अशी माहिती पक्ष कार्यालयातून देण्यात आली. यावेळी युवा नेते अमित ठाकरे, जेष्ठ नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदिप देशपांडे, अविनाश जाधव व योगेश परूळेकर तसेच नाशिक मधून जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकूश पवार, विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, सत्यम खंडाळे, रामदास दातीर, नितीन साळवे, विक्रम कदम व योगेश लभडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पोलिसांची दक्षता अन् टळला अनर्थ! नाशिकमधील घटना

loading image
go to top