esakal | यूपीएससी परिक्षार्थीनी नाशिक केंद्र निवडावे : हेमंत गोडसे
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik mp hemant godase

यूपीएससी परिक्षार्थीनी नाशिक केंद्र निवडावे : हेमंत गोडसे

sakal_logo
By
विनोद बेदरकर


नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नाशिक परिक्षा केंद्राचा पर्याय उपलब्ध झाला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षा मंडळाकडे पाठपुरावा केल्याने नुकतेच यूपीएससी परिक्षेसाठी नाशिक परिक्षा केंद्र उपलब्ध केले आहे. (upsc candidates should choose nashik as exam center says mp hemant godse)


ऑक्टोबर २०२१ महिन्यातील नियोजित परिक्षेसाठी अर्ज दाखल करताना आयोगाने परिक्षेच्या ऑनलाइन संकेतस्थळावर नाशिक शहराचा पर्याय उपलब्ध केला आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावर नाशिक परिक्षा केंद्राची निवड करता येणार आहे. नाशिक येथे परिक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावे, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून परिक्षार्थीसह त्यांच्या शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेऊन परिक्षा केंद्राविषयी मागणी केली होती. खासदार गोडसे दखल घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दिल्ली येथील कार्यालयात नाशिक परिक्षा केंद्रासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान आजपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाने नाशिक येथे परिक्षा केंद्र प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली आहेत. परीक्षार्थी, परिक्षा केंद्र आणि आयोग यांच्यातील नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा: नाशिकच्या मेट्रो निओला वाराणसीचा अडसर

असे निवडा नाशिक परिक्षा केंद्र

यूपीएससी परिक्षा मंडळाने नाशिक परिक्षा केंद्राची निवड करण्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळावर पहिल्या टप्प्यात १२ ते १९ जुलै सायंकाळी सहापर्यंत, दुसऱ्या, तसेच दुसऱ्या टप्प्यात २६ ते ३० जुलै दरम्यान ही सुविधा यूपीएससीच्या https : //upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.


आगामी यूपीएससी परिक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांसाठी आयोगाने एक विशेष परिपत्रक काढले असून संकेतस्थळावर नाशिक परिक्षा केंद्राची निवड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षार्थींनी संकेतस्थळाला भेट देत परिक्षा अर्जात फेरबदल करून नाशिक केंद्राची निवड करावी.
- हेमंत गोडसे, खासदार.

(upsc candidates should choose nashik as exam center says mp hemant godse)

हेही वाचा: आस्थेवाईक बोलीने नाशिककर भारावले..!

loading image