esakal | नाशिकच्या मेट्रो निओला वाराणसीचा अडसर; प्रकल्प लांबण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

nashik metro

नाशिकच्या मेट्रो निओला वाराणसीचा अडसर

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये टायरबेस मेट्रो सुरू करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी नाशिक मेट्रो निओ प्रकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक मेट्रोची भुरळ पडली असून, वाराणसी मतदारसंघातदेखील नाशिकबरोबरीने काम सुरू करण्याचा आग्रह धरण्यात आल्याने नाशिकचा प्रकल्प लांबण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. Metro project in Varanasi is becoming an obstacle to Nashik Neo Metro


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१८ ला नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शहरात मेट्रोचे सर्वेक्षण करण्याचे काम सिडको आणि महामेट्रोकडून करण्यात आले. नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ताशी २० हजार प्रवासी क्षमता उपलब्ध नसल्याने एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो चालविण्याची शिफारस महामेट्रोने केली होती. त्यानुसार टायरबेस मेट्रो सेवेसाठी दिल्ली येथील राइट्स कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. ऑगस्ट २०१९ मध्ये ‘मेट्रो निओ’ असे प्रकल्पाचे नामकरण करण्यात आले. त्यानंतर केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मेट्रो निओ प्रकल्पासाठी दोन हजार ९२ कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली. प्रकल्पासाठी २१००.६ कोटी खर्च येणार असून, राज्य सरकार, सिडको व महापालिकेचा वाटा २५५ कोटींचा असणार आहे. केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये, तर एक हजार १६१ कोटी कर्ज स्वरूपात उभारले जाणार आहे. प्रकल्पासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देणार आहे. कोरोनामुळे मेट्रो निओ प्रकल्पाला फटका बसला. कोरोनाचा अडथळा आला नसता तर आतापर्यंत एजन्सी नियुक्त होऊन प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली असती. मात्र अर्थसंकल्प मंजुरी, कॅबिनेटची मंजुरी व आता पंतप्रधान कार्यालयाकडे प्रकल्पाची नस्ती पडून असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसीसमुळे ७० जणांचे मृत्यू


पंतप्रधानांची सूचना अन्‌ विलंब

नाशिक मेट्रो निओ प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करायचा आहे, परंतु कोरोनामुळे विलंब होत असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेट्रो निओचा प्रकल्प आवडल्याने वाराणसी या त्यांच्या मतदारसंघात प्रकल्प होण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात त्यांनी वरिष्ठांना सूचनादेखील दिल्याचे सांगितले जात आहे. नाशिक व वाराणसीमध्ये एकाच वेळी दोन्ही प्रकल्प साकारण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नाशिकच्या मेट्रो निओ प्रकल्पाच्या मंजुरीला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये तुटवड्यामुळे सार्वजनिक लसीकरण ठप्प

loading image