मालेगाव- मालेगाव तालुक्यातील सटाणा-अजमेर सौंदाणे-रावळगाव-अजंग-झोडगे या रस्त्याचे मजबुतीकरण आणि रुंदीकरण करण्याचे काम सुरु आहे. सदर प्रकल्पातील रस्ता रावळगाव हद्दीतून पंचशीलनगर येथील निवासी क्षेत्रातून जाणार असल्याने अनुसुचित जाती, जमाती, भटके विमुक्त आदी समाजातील नागरीकांची घरे पाडली जाणार आहेत.