Nashik News: हॉटेल व्यवसायिकांकडून घरगुती सिलिंडरचा वापर; पुरवठा विभागाची डोळेझाक

The use of domestic cylinders in a clandestine operation in a hotel.
The use of domestic cylinders in a clandestine operation in a hotel.

Nashik News: नाशिक शहर तसेच सिडको, अंबड भागात हॉटेल व्यवसायिकांकडून घरगुती सिलिंडरचा वापर व्यवसायासाठी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे.

या सर्व प्रकाराकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. (Use of domestic cylinders by hoteliers nashik news)

घरगुती सिलिंडर हे फक्त नागरिकांनी घरात वापरायचे असते. तर इतर कामांसाठी व्यावसायिक सिलिंडर वापरणे बंधनकारक आहे. कारण घरगुती सिलिंडर व व्यावसायिक सिलिंडर यांच्या किमतीत दुपटीचा फरक आहे. हे पैसे वाचवण्यासाठीच व्यावसायिक छुप्या पद्धतीने घरगुती सिलिंडरचा वापर करत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.

सर्रासपणे उघडपणे या गोष्टी प्रशासनाला आव्हान देत असून या प्रकाराकडे डोळेझाक होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

The use of domestic cylinders in a clandestine operation in a hotel.
Nashik News : ज्येष्ठांच्या ‘स्मृती’ अनेकांना नकोशा; सार्वजनिक ठिकाणी टाकल्या जाताहेत फोटो अन मूर्त्या

हॉटेल व्यवसायिकांना घरगुती सिलिंडर हे गॅस एजन्सीच्या एजंटाकडून ब्लॅकने मिळतात. ते त्यांना सर्रासपणे पुरवले जातात.

हे सिलिंडर गॅस दुकानातून घेताना किंवा गोडाऊनमधून बाहेर काढताना ग्राहकांच्या नावाने बाहेर काढले जातात. तिथे ग्राहकांपर्यंत पोचतच नाही. हे सिलिंडर व्यावसायिकांना वाढीव दराने विकत ब्लॅकचा व्यवसाय तेजीत असल्याचा प्रकार समोर येत आहे. यावर प्रशासन कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The use of domestic cylinders in a clandestine operation in a hotel.
Nashik News: बसथांबा स्वच्छतागृह ठेकेदाराकडून बेकायदेशीर वसुली; ‘महिलांसाठी मोफत’ फलक लावण्याचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com