Child Crime : सराईत गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलांचा वापर; गुन्हेगारीचे वाढते प्रमाण!

child Criminals
child Criminalsesakal

नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण पोलिसांसाठी डोकेदुखी ठरते आहे. गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्यानंतरही अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालनिरीक्षण गृहात होते. त्यानंतर बाल न्यायालयात खटला चालून त्यांची जामीनावर सुटकाही होते.

त्यामुळे गुन्हा केल्यानंतरही कायद्याचा गैरफायदा घेऊन बाहेर आलेले हे अल्पवयीन गुन्हेगार पुन्हा गुन्हे करीत असल्याने पोलिसांसमोर यावर आळा घालण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. (use of minors by criminals Increasing crime rate nashik Child Crime news)

पंचवटी परिसरातील गंगाघाट, निमाणी बसस्थानक, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, पेठ रोड, फुलेनगर, बाजार समिती आवारात चोऱ्यामाऱ्या, हाणामाऱ्या, पाकिटमार, मोबाईल चोर, दुचाकी चोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन गुन्हेगारांच्या टोळ्याच कार्यरत आहेत.

तसेच, आठवडे बाजारादरम्यान वा गंगाघाटावर आलेल्या पर्यटकांची पर्स, मोबाईल, मौल्यवान वस्तू चोरून नेण्याच्या ज्या घटना घडतात, त्यामागेही अल्पवयीन गुन्हेगारच असतात. यासंदर्भात पोलीसात तक्रारी दाखल होतात.

त्यातून संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर ते अल्पवयीन असल्याने त्यांना न्यायालयात हजर न करता बालनिरीक्षण गृहात दाखल केले जाते आणि काही दिवसात ते पुन्हा बाहेर येऊन परत त्यांच्या चोऱ्यामाऱ्या सुरू होतात. विशेषत: गंगाघाट परिसर, पंचवटीतील झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलांचा वापर त्याच परिसरातील सराईत गुन्हेगार करून घेत असल्याचे पोलिस तपासातही समोर आलेले आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

child Criminals
Nashik News : रेकॉर्डिंग अभावी CCTV फक्त शो पीस! बँकांसह व्यापाऱ्यांकडे डेटा सेव्ह नसल्याने अडचण

सराईत गुन्हेगारांकडून अशा मुलांना नशेची सवय लावून त्यांना त्याच्या आहारी केले जाते. त्यामुळे ही मुले शाळेमध्ये न जाता गंगाघाटावर जाऊन नशा करतात आणि त्यासाठी सराईत गुन्हेगार त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतात.

मात्र, अशा अल्पवयीन गुन्हेगारांना आळा घालायचा कसा, असा प्रश्‍न सध्या पोलीसांना भेडसावतो आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अल्पवयीन मुले खुनांच्या गुन्ह्यामध्येही निष्पन्न होऊ लागल्याने पोलिसांसमोर मोठेच आव्हान उभे राहिले आहे.

सोशल मीडियाचा परिणाम

लहान मुलांच्या हाती स्मार्ट मोबाईल आल्याने ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाले आहेत. तसेच, समाज माध्यमावर येणाऱ्या वेबसीरिज, गुन्हेगारी सिनेमे याचा थेट परिणाम या अल्पवयीन मुलांवर होतो आहे.

त्यामुळे झटपट पैसा व मजामस्ती करण्याच्या उद्देशाने ही अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळू लागली आहे. त्याचा गैरफायदा सराईत गुन्हेगार करताना पोलिस तपासातून समोरही आलेले आहे.

child Criminals
SAKAL Exclusive : एकावेळी एकाच ठाण्याकडून 21 संशयितांची तडीपारी!

खुनापर्यंत जाते मजल

दोन महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्‍वर येथील आधारतीर्थ आश्रमात लहानग्या चिमुरड्याचा आश्रमातील १२ वर्षांच्या मुलाने गळा आवळून खून केला आहे. लहान मुलांमध्ये दुसऱ्याचा जीव घेण्यापर्यंत गेलेली मजल चिंताजनक आहे.

तसेच, दोन दिवसांपूर्वी पंचवटीतील तीन शाळकरी मुलांकडे लाखो रुपये सापडले असून, ते पैसे त्यांनी कोठून आणले याचा पोलिस शोध घेत आहेत. याशिवाय, चोऱ्या, हाणामाऱ्यांमध्येही लहान मुलांना समावेश असतो.

"मुलांच्या हाती मोबाईल आला आहे. त्याकडे पालकांचे लक्ष नाही. मुलं शाळेत काय करतात, त्यांची संगत, सोबतीला कोण आहेत याकडे पालकांनी काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. काही वेळा मुले कुतूहलातून गुन्हेगारीकडे वळतात.त्यांना जाणीव नसते. त्यामुळे शाळांमध्ये सामाजिक संस्थांकडून वारंवार जनजागृती केली जाते. परंतु पालकांचीही मुख्य जबाबदारी असून, मुलांच्या वर्तनाकडे लक्ष दिले पाहिजे."

- प्रणिता तपकिरे, जिल्हा-शहर समन्वयक, चाईल्डलाईन, मविप्र समाजकार्य महाविद्यालय, नाशिक.

"बाल गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या शहरांमध्ये झपाट्याने वाढते आहे. मुलांमध्ये प्रबोधनाची गरज असून, त्यासाठी शिक्षक, पालक, पोलिस आणि सामाजिक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून ते करता येऊ शकेल. तर, बाल गुन्हेगारीसंदर्भातील कायद्यातही संशोधन सुरू आहे. ज्यामुळे कायद्याचा आधार घेणे येत्या काळात शक्य होणार नाही."

- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा, नाशिक.

child Criminals
SAKAL Special : आदिवासी भागातील मंजुळा गवळी यांनी शेतात केला आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com