नाशिक : शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संशोधनाला पेटंट म्हणून मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion

नाशिक : शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संशोधनाला पेटंट म्हणून मान्यता

मालेगाव (जि. नाशिक) : कांदा (Onion) उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे संशोधन मसगा महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश शिरुडे, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रवीण पाटील व संगणक शास्त्र विभागाचे प्रा. नंदकुमार माळी यांनी केले आहे. (useful research for farmers approved as patent Nashik Agriculture News)

हेही वाचा: सिन्नर, पिंपळगाव (बसवंत) मार्गावर CITILINK जलद बससेवा; असे आहे वेळापत्रक

उत्पादनानंतर काहीकाळ कांदा चाळीत भरला जातो. त्यानंतर ठराविक दिवसांनी साठवलेल्या कांद्यामधील खराब झालेला कांदा निवडण्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांना लागणारा खर्च हा खूप मोठा आहे. सर्वदूर मजुरांची कमतरता असल्याने कांदा निवडणे ही एक समस्या शेतकऱ्यांपुढे उभी आहे. त्यालाच पर्याय म्हणून आयओटी (IOT) तंत्रज्ञानाचा उपयोग करून कांदा निवडण्यासाठी इमेज प्रोसेसिंग (Image Processing) करणारे यंत्र या प्राध्यापकांनी तयार केले आहे. त्याला शासकीय पेटंट कार्यालयामार्फत ( Government Patent Office) प्रकाशित करण्यात आले आहे. या समाजोपयोगी संशोधनासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर (MGV) संस्थेचे सरचिटणीस प्रशांतदादा हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा: देवळाली गावातील क्रेडिट सोसायटीत 46 लाखाचा अपहार

Web Title: Useful Research For Farmers Approved As Patent Nashik Agriculture News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikonionprashant hiray
go to top