सिन्नर, पिंपळगाव (बसवंत) मार्गावर CITILINC जलद बससेवा; असे आहे वेळापत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Citilink nashik

सिन्नर, पिंपळगाव (बसवंत) मार्गावर CITILINC जलद बससेवा; असे आहे वेळापत्रक

नाशिक : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थात सिटीलिंकने (CITILINK) मार्ग क्रमांक १४६ ए तसेच मार्ग क्रमांक १५२ म्हणजेच सिन्नर आणि पिंपळगाव बसवंत या दोन मार्गावर जलद बससेवा सुरु केली आहे. सिन्नर आणि पिंपळगाव (बसवंत) येथून दररोज नाशिकला ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी असून या सेवेमुळे नागरिकांची सोय होणार आहे.

असे असेल जलद बससेवेचे वेळापत्रक

सिन्नर तसेच पिंपळगाव (बसवंत) येथून दररोज अनेक कर्मचारी नाशिककडे येतात. या मार्गावर अपडाऊन करणाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आता सिटीलिंकने कार्यालयीन वेळेनुसार जलद बससेवा सुरु केली आहे. मार्ग क्रमांक १४६ ए वरील पहील्या फेरीत सिन्नर ते निमाणीसाठी सकाळी 9 वाजता या मार्गावर सिन्नर तहसील कार्यालयापासून सिन्नर एमआयडीसी पर्यंत सर्वसाधारण थांबे देण्यात आले असून त्यानंतर ही बस थेट नाशिक रोडला बिटको येथे थांबा घेईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी उपनगर, द्वारका, शालिमार, सीबीएस, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी, निमाणी याठिकाणी बस थांबा घेईल. तर दुसऱ्या फेरीत सिन्नरसाठी सायंकाळी 6.30 ला ही बस निमाणी येथून सुटेल व पंचवटी, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, सीबीएस , शालिमार, द्वारका, उपनगर, बिटको येथून थेट सिन्नर येथे पोहचेल.

हेही वाचा: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : छगन भुजबळ

दुसऱ्या मार्गावर अशी असेल बस सेवा

मार्ग क्रमांक १५२ वरील पहील्या फेरीत पिंपळगाव ते नवीन सीबीएससाठी सकाळी 9.15 ला ही बस पिंपळगाव वणी चौफुली ते पिंपळगाव मार्केट यार्ड दरम्यान सर्वसाधारण थांबे घेऊन थेट नाशिक मधील औरंगाबाद नाका येथे पोहचेल. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी निमाणी, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा येथे थांबा घेऊन नवीन सीबीएस येथे पोहचेल. दुसऱ्या फेरीत नवीन सीबीएस ते पिंपळगाव साठी संध्याकाळी 6.15 वाजता ही बस नवीन सीबीएस, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, निमाणी, औरंगाबादनाका मार्गे थेट पिंपळगाव पर्यंत धावेल.

हेही वाचा: भोंग्यांबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाही; अजितदादांचा राज ठाकरेंना इशारा

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर या दोन मार्गांवर एकूण 4 जलद बसफेऱ्यांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यालयीन वेळेनुसार जलद बसफेऱ्या सुरु करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय टळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी या जलद बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकतर्फे करण्यात आले.

Web Title: Citylink Express Bus Service In Sinnar Pimpalgaon Baswant Route In Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top