आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदचे उदघाटन

आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदचे उदघाटन
Published on: 
ॲंकर NSK26H31176 जळगाव : आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी उस्ताद शाहीद परवेज खान, जिल्हाधिकारी रोहन घुगे, खासदार स्मिता वाघ, ॲड. प्रकाश पाटील, भालचंद्र पाटील आदी. ---------- सतार वादनाला जळगावकरांची भरभरून दाद --- आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे पद्मश्री उस्ताद शाहिद परवेज खान यांच्या हस्ते उद्‌घाटन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : सुप्रसिद्ध सतार वादक पद्मश्री उस्ताद शाहीद परवेज खान यांनी बालगोपाळांसह सादर केलेल्या सतार वादनाला उपस्थित जळगावकर रसिकश्रोत्यांनी भरभरून दाद दिली. निमित्त होतं स्पीक मेके व केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेच्या उद्‌घाटनाचं. पद्मश्री खान यांच्याच हस्ते या परिषदेचं उद् घाटनही झालं. येथील मूळजी जेठा महाविद्यालयातील महाकवी कालिदास सभागृहात गुरुवारी (ता.१) सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाच्‍या उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, ‘केसीई’चे व्यवस्थापन परिषद सदस्य व स्वागताध्यक्ष भालचंद्र पाटील, तबलावादक उन्मेष बॅनर्जी, स्पीक मेकेचे समन्वयक डॉ. सिंपी सिंग, ‘केसीई’च्या शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस मंचावर होते. देशभरातील ३१० जणांचा सहभाग चार दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाद्वारे १३ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व कलावंतांचे सादरीकरण होत आहे. या महोत्सवात गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रातील ३१० विद्यार्थी सहभागी आहेत. परिषदेसाठी नृत्य दालनाला दिवंगत कलावंत पंडित बिरजू महाराज दालन, संगीत दालनाला पंडित पलूसकर-पंडित भातखंडे, तर तबलावादन दालनाला दिवंगत तबलावादक पंडित झाकीर हुसेन दालन व चित्रकलेच्या दालनाला चाळीसगाव तालुक्यातील केकी मूस प्रेरणा कलादालन असे नामकरण करण्यात आले आहे. रसिका ढेपे या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले. सप्तकलांचे बहारदार सादरीकरण स्पीक मेकेच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कान्ह ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सप्तकलांचे बहारदार सादरीकरण करीत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी चित्रकला, शिल्पकला, गायन, वादन, नाट्य व अभिनयाच्या माध्यमातून आपल्या सुप्तकलांना वाट मोकळी करून दिली. यावेळी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी कलावंतांना भरभरून दाद देत त्यांच्या कलेची वाहवा केली. केसीई सोसायटीचे व्यवस्थापन परिषद सदस्य, विविध शाखांचे प्राचार्य, प्रमुख, शिक्षक व खानदेशातील कला, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी, रसिक-श्रोते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com