Red Corn
sakal
दत्तात्रेय खुळे, वडांगळी: पांगरी बुद्रुक (ता. सिन्नर) येथील शेतकरी उत्तम वाळुंज यांनी प्रथमच लाल मक्याची (रेडकॉर्न) लागवड केली आहे. दोन एकर क्षेत्रावर घेतलेले मक्याचे पीक चांगलेच बहरले. लाल मक्याचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असून, त्याची पंचक्रोशीत जोरदार चर्चा आहे. दरम्यान, या पिकाचे साधारण ६० क्विंटल उत्पादन मिळेल, असा अंदाज वाळुंज यांनी वर्तविला आहे.