धुळे : टुडे पान २ साठी...
--
फोटो क्रमांक : 35318
धुळे : माजी खासदार उत्तमराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करताना मान्यवर.
--
उत्तमराव पाटील पुरोगामी विचारांचे ध्येयवादी नेते
--
महेंद्र निळे : धुळ्यात स्मृतिदिनी अभिवादन, आठवणींना उजाळा
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : माजी खासदार उत्तमराव पाटील सर्वसामान्य जनतेचे नेते होते. मोठ्या पदावर पोहोचूनही ते साधेच राहिले. ते पुरोगामी विचारांचे ध्येयवादी नेते होते, अशा शब्दांत वेस्ट खानदेश दलित शिक्षणप्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र निळे यांनी उत्तमराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष, माजी खासदार उत्तमराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. या वेळी मान्यवरांनी दिवंगत पाटील यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. श्री. निळे यांनी जनसंघातून खासदार म्हणून निवड झालेले उत्तमराव पाटील आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्लीत एकत्र घालवलेल्या आठवणी सांगितल्या. ॲड. रावसाहेब निळे यांच्यातील मैत्री शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांना धरून होती. राजकीय विचारसरणी वेगळी असतानाही त्यांनी संस्थेच्या उभारणीत मोलाची साथ दिली, असे ते म्हणाले. अजित पाटील, प्रदीप पाटील, ॲड. निकम, सचिव शशिकांत पाटील, प्राचार्य व्ही. वाय. बहिरम, प्राचार्य डी. बी. पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील आदी उपस्थित होते.