सुट्टीतील वाचनालय; 'रूम टू रिड' योजनेंतर्गत पवारवस्तीत वाचनालय सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Room to read started in pawarwadi

सुट्टीतील वाचनालय; 'रूम टू रिड' योजनेंतर्गत पवारवस्तीत वाचनालय सुरू

नामपूर (जि.नाशिक) : पवारवस्ती (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (ZP Primary School) विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत (Summer Holidays) वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी रूम टू रिड योजनेंतर्गत (Room to Read) वाचनालय (Library) सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आदिवासी भागातील पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाची मोहोर उमटली आहे. शाळेच्या स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे. (Vacation library Launched at Pawar Wasti under Room to Read scheme Nashik news)

जिल्हा समन्वयक श्रीमती कांचन भस्मे यांनी नुकतीच पवारवस्ती गावास भेट देवून विद्यार्थ्यांशी हितगूज केले. त्यांच्यासोबत तालुका समन्वयक गणेश जालगुंडे, केंद्र समन्वयक मनीष शेवाळे आदी उपस्थित होते. श्रीमती भस्मे यांनी विद्यार्थ्यांचे वाचन, स्वतंत्र वाचन, गट वाचन, सहवाचन, जोडी वाचन आदी विविध प्रकारचे उपक्रम व कृतियुक्त गीते घेवून गोष्टी सांगितल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. श्रीमती भस्मे यांनी उपक्रमाचे कौतूक केले. सदाशिव अहिरे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. उपक्रमशील शिक्षक प्रेमानंद घरटे यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा: नाशिक : ग्रामपंचायत प्रशासन व शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाला ठोकले कुलूप

सदर उपक्रमासाठी बागलाणच्या गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे, केंद्रप्रमुख प्रवीण वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक भामरे, संजय भामरे, संदीप भामरे, अमोल भामरे, रामदास भामरे, राजू भामरे आदी उपस्थित होते. अमोल भामरे यांनी आभार मानले.

हेही वाचा: Nashik : 13 लाखांची धाडसी घरफोडी; दागिने व रक्कम लंपास

Web Title: Vacation Library Launched At Pawar Wasti Under Room To Read Scheme Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top