esakal | नाशिक शहरात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक!

बोलून बातमी शोधा

Vaccination
नाशिक शहरात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक!
sakal_logo
By
विक्रात मते

नाशिक : रेमेडीसिव्हर, ऑक्सिजन तुटवडा पाठोपाठ आता केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली लसीकरण मोहीम लसींच्या तुटवड्यामुळे पुन्हा बंद पडली आहे. चार दिवसापूर्वी महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आलेल्या 41000 लसींची डोस आज संपुष्टात आल्याने अनेक केंद्रांवर नागरिकांना परत जावे लागले. विशेष म्हणजे एक मेपासून केंद्र सरकारने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला होता त्या पार्श्वभूमीवर अनेक जण आदल्या दिवशी केंद्रावर पोचले मात्र लसीचा तुटवडा दिसून आल्याने भविष्यात ही मोहीम किती काळ टीकेल याबद्दल शंका उपस्थित करण्यात आल्या.

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी देशभरात कोविशिल्ड व को व्हॅक्सिन देण्याची मोहीम 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आली. महापालिकेला आत्तापर्यंत कोविशील्ड चे दोन लाख 51 हजार सहाशे पन्नास डोस प्राप्त झाले तर को व्हॅक्सीन चे 43 हजार 960 डोस प्राप्त झाले. यापूर्वी शनिवारी डोस संपल्यानंतर संपूर्ण शहरात लसीकरण मोहीम थंडावली होते. मात्र सोमवारी (ता.26) महापालिकेला जिल्हा रुग्णालयातून तीस हजार लसींची डोस उपलब्ध करून देण्यात आले. सोमवार ते बुधवार असे तीन दिवस मोहीम चालली गुरुवारी मात्र मोहीम सुरू झाली नाही. दुपारी जिल्हा रुग्णालयाकडून 11000 डोस नव्याने मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारपर्यंत लसीकरणाची मोहीम कशीबशी पार पडली त्यानंतर मात्र अनेक नागरिकांना लस न घेताच माघारी फिरावे लागले.

हेही वाचा: संतापजनक प्रकार! जात पंचायतने महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा..

शहरात महापालिकेचे 27 तर खाजगी 22 केंद्रांवर लसीकरणाची मोहीम सुरू आहे सर्वच केंद्रांवर गर्दी उसळत असली तरी लसीनचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. महापालिकेने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे अधिक डोस ची मागणी केली आहे. लवकरच डोस प्राप्त होऊन पुन्हा लसीकरण मोहीम सुरू होईल. डॉ. अजिता साळुंखे, समन्वयक वैद्यकीय विभाग, महापालिका.

हेही वाचा: धक्कादायक प्रकार! एमआयडीसी, अन्न-औषध प्रशासन अधिकाऱ्याकडून ऑक्सिजनची पळवापळवी