नाशिक : बिटको कोविड सेंटर येथे 15 ते 18 वयोगटाचे लसीकरण सुरू | Vaccination | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

नाशिक : बिटको कोविड सेंटर येथे 15 ते 18 वयोगटाचे लसीकरण सुरू

नाशिक रोड : तिसरी लाट (Third wave) थोपवण्यासाठी केंद्र सरकार सतर्क पावले उचलत आहे. यासाठी केंद्र सरकारमध्ये संपूर्ण तयारी झाल्यानंतरच सबंध राज्यांमध्ये 15 ते 18 वयोगटातील युवा वर्गाला लसीकरण (Vaccination) सुरू केले आहे. लसीकरणाबाबत कुणाला काही अडचणी असल्यास ऑनलाईन अडचणी नोंदवू शकतात. जसे लसीकरण वेग धारण करेल त्या प्रमाणे अडचणींचे निराकरण होण्यास मदत होऊ शकते. मास्क (Mask) वापरणे सॅनिटायझर (Sanitizer)चा वापर करणे व सुरक्षित अंतर बाळगणे या गोष्टी सर्वांनी कटाक्षाने पाळायला हव्यात असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Union Minister of State for Health Bharti Pawar) यांनी केले.

नाशिक रोड येथील बिटको कोविड सेंटर येथे 15 ते 18 वयोगटातील युवा वर्गाच्या लसीकरणाचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी भारती पवार यांनी सांगितले की महाराष्ट्र, केरळ येथे जलद गतीने कोरोना (Corona) सह ओमायक्रोन (Omicron) चा प्रसार होत आहे. वेगवेगळ्या राज्यात एअरपोर्टवर गाईडलाईन्स पाळला जात आहे. ज्या राज्यांमध्ये प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे अशा ठिकाणी केंद्रातल्या आरोग्य यंत्रणा स्वतः लक्ष घालून येथे उपाय योजना करीत आहे. तपासण्यांसाठी वेगळ्या स्तरावर उपाययोजना करण्याचे चालू असून नागरिकांनी नियम पाळून सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा: "ओवैसी आधुनिक औरंगजेब तर मोदी-शहा शिवाजी महाराजांचे अवतार"


यावेळी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, भाजपचे नगरसेवक कोमल मेहरोलिया, संभाजी मोरुस्कर, शहराध्यक्ष गिरीश पालवे, शिक्षण मंडळ सभापती संगीता गायकवाड, नगरसेवक सूर्यकांत लवटे, संदर्भ सेवा रुग्णालयाचे डॉ. पी. डी. गांडाळ, डॉ. बापूसाहेब नागरगोजे, बिटको कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर, मेट्रन आशा मुठाळ, दीपक लवटे, मनसेचे श्याम गोहाड उपस्थित होते. यावेळी 15 ते 18 वयोगटातील युवावर्गाला लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला.

हेही वाचा: आधी लग्नसोहळे, मेळावे उरकले; कोरोना वाढताच कार्यक्रम रद्द

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top