ओवैसी आधुनिक औरंगजेब तर मोदी-शहा शिवाजी महाराजांचे अवतार; भाजप नेत्याचं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Owaisi_Shah_Modi
ओवैसी आधुनिक औरंगजेब तर मोदी-शहा शिवाजी महाराजांचे अवतार; भाजप नेत्याचं विधान

"ओवैसी आधुनिक औरंगजेब तर मोदी-शहा शिवाजी महाराजांचे अवतार"

लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी एक अजब विधान केलं आहे. त्यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना औरंगजेबाची तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे. ही तुलना करताना त्यांनी ओवैसींवर वादग्रस्त शब्दात टीकाही केली. (Owaisi modern Aurangzeb Modi Shah Shivaji Maharaj incarnation MLA Surendra Singh statement)

हेही वाचा: राष्ट्रीय राजकारणात 'आप'ची दमदार एन्ट्री; पंजाबात केजरीवालांची सत्ता?

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आहेत ज्यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्यासारख्या आधुनिक औरंगजेबाचा खात्मा करण्यासाठी अवतार घेतला आहे, असं सिंह यांनी म्हटलं आहे. ओवैसी हे औरंगजेबाचे अपत्य असून ते देशात फूट पाडण्याचं काम करत आहेत. तसेच सध्याच्या भारतात ते मुहम्मद अली जीना याचं प्रतिनिधीत्व करत आहेत," असंही सिंह यांनी म्हटलं आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.

हेही वाचा: लखीमपूर हिंसाचारात गृहराज्य मंत्र्यांचा मुलगाच मुख्य आरोपी, SIT रिपोर्ट

सिंह यांनी यापूर्वीही ओवैसी यांच्यावर टीका करताना त्यांना 'राजकीय दहशतवादी' म्हटलं होतं. ओवैसी हे देशातील नागरिकांना भडकवण्याचं काम करत असून समाजात फूट पाडत आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा: राज्यात लॉकडाऊनचे संकेत, अजित पवारांचं साताऱ्यात मोठं विधान

दरम्यान, पीयूष जैन यांच्या घरावर इन्कम टॅक्सने टाकलेल्या छाप्यांवरून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्यावर निशाणा साधत सुरेंद्र सिंह म्हणाले की, ज्या व्यक्तीवर छापा टाकण्यात आला तो सपा नेत्यांचा कुबेर होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh news
loading image
go to top