नाशिक- सध्या गाजत असलेल्या ‘आया रे तुफान...’द्वारे तमाम नाशिककरांमध्ये वीररस भरत प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील वातावरण अक्षरश: भारावून टाकले. ‘शूर आम्ही सरदार आम्हाला...’ यासह सादर केलेली पारंपरिक लोकगीतांचा बाज असलेली गाणी, उखाणे यांच्या जोडीने त्यांनी आपल्या ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यात भर घातली ती ‘गुलाबी हवे’च्या हलक्याशा लहरीवर स्वार होऊन ठसकेबाज ऐटीतल्या ‘ऐका दाजिबा’ने. तमाम नाशिककर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ताल व ठेका धरत कार्यक्रमाचा आनंद लुटला.