प्रत्येक भागातील प्रेक्षक वेगळा असतो. पुण्या-मुंबईचा प्रेक्षक वेगळा आणि सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागातील प्रेक्षक वेगळा. शिवाय आता नाशिकला खूप दिवसांनी येतेय त्यामुळे नाशिककर प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतोय त्याची उत्सुकता अधिक आहे. .‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने नाशिककरांसाठी गायिका वैशाली सामंत यांच्या ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’चे आयोजन येत्या शनिवारी (ता. १५) त्र्यंबक रोड येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा....नाशिकमध्ये होणाऱ्या कॉन्सर्टसाठी किती उत्सुक आहात? वैशाली सामंत : प्रत्येक भागातील प्रेक्षक वेगवेगळा असतो. जेव्हा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात कार्यक्रम होतो, तेव्हा प्रेक्षकांच्या गाण्याची फर्माईश इतकी वेगळी असते की आश्चर्य वाटते. शिवाय खूप दिवसांनी नाशिकला येतेय त्यामुळे नाशिककर प्रेक्षकांना कोणती गाणी ऐकायला आवडतील, त्यांची गाण्याची पसंती काय आहे या सर्व गोष्टींसाठी नाशिककर प्रेक्षकांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे..विविध भाषांमध्ये गाणी गाण्याचा अनुभव कसा असतो? : विविध भाषांमध्ये गाणी गाण्याचे संपूर्ण क्रेडिट मी मराठी भाषेला देईन. तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर भाषा ही ताकद असायला हवी. त्यासाठी इतर प्रादेशिक भाषाही शिकायला हव्यात. साथिया चित्रपटातील छलका छलका गाण्याचे तमिळ गीत गायिल्यावर दिग्दर्शक मणिरत्नम यांनी खूप कौतुक केले होते. सुरुवातीला त्या भाषेतील उच्चार जाणून घेत त्याचा अर्थ समजून घ्यायचा. त्यानंतर त्याचे भाषांतर करून त्यातील भाव जाणून घ्यावे लागतात. हिंदी-मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषांमध्ये गाणी गाण्याचा अनुभव सुंदर होता. .‘ऐका दाजिबा...’नंतर मराठी गाण्यांमध्ये अनेक बदल झाले? : ‘ऐका दाजिबा...’ गाणे मराठी संगीत क्षेत्रातील वेगळा प्रयोग होता आणि ते गाणे प्रचंड हिट झाले. त्यानंतर त्याचे ठिकठिकाणी खूप कॉन्सर्ट झाले. या गाण्याच्या यशानंतर संगीत क्षेत्रात स्वत:ची छोटीशी जागा निर्माण झाली होती. तो एक वेगळा आणि अनोखा प्रयोग होता. त्यानंतर मराठी संगीत क्षेत्रात ‘चमचम करता...’, ‘कोंबडी पळाली...’ यांसारखे नवनवीन प्रयोग व्हायला सुरुवात झाली. .इंडिपॉप कल्चरमध्ये गाण्याचा अनुभव कसा होता?: जगभरात संगीत क्षेत्रात निरनिराळे प्रयोग केले जातात. २००३ मध्ये इंडिपॉप कल्चर उदयाला आले होते. त्यातच अनेक जुनी गाणी नवीन व्हर्जनमध्ये गाण्याची संधी मिळाली. त्यालाही दोन प्रकारचा प्रेक्षक मिळाला. एक गाण्यांच्या बाजूने बोलणारा आणि दुसरा त्याच्या विरोधात बोलणारा. या गोष्टी होणे गरजेच्या असतात. त्यातून प्रेक्षकांचा कल समजत असतो. .आत्ताच्या नवोदित गायकांना कोणता सल्ला द्याल? : गायिका, संगीतकार, गीतकार, निर्माती म्हणून काम केले. तुमच्या एका कामावर केलेली मेहनत तुम्हाला दुसरे काम मिळवून देते. त्यामुळे काम असे करा की एका कामातून दुसरे काम मिळत जाईल. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष सुरूच असतो. तो अनुभव नवीन निर्णय घेण्यासाठी खूप उपयोगी पडतो. त्यामुळे सतत नवनवीन प्रयोग करून बघायला हवेत. त्यातून नवीन वाट सापडत जाते. .कार्यक्रम दृष्टिक्षेपात वैशाली सामंत लाइव्ह इन कॉन्सर्ट ः शनिवार (१५ मार्च) ठिकाण : हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, त्र्यंबक रोड, नाशिक वेळ : सायंकाळी ५ वा.कार्यक्रमाची तिकिटे बुकमायशो ॲपवर उपलब्ध आहेत. त्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा. वैशाली सामंत यांची कोणती गाणी कार्यक्रमात ऐकायला आवडतील? ती गाणी खाली दिलेल्या क्रमांकावर कळवा. ‘बुकमायशो’ (bookmyshow)वर त्वरित तिकीट बुक करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.