नाशिक- अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या ‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित गायिका वैशाली सामंत ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’च्या तिकीट विक्रीला नाशिककरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून, कॉन्सर्टमध्ये मराठी मालिकांचे शीर्षकगीत, कोळीगीत, मराठी-हिंदी गाणी ऐकायला मिळणार आहेत. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर कॉन्सर्टची जोरदार तयारी सुरू असून, शनिवारी (ता. १५) सायंकाळी पाचला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.