Manish Chavan
sakal
इगतपुरी - तालुक्यातील वैतरणा धरण आणि दुगारवाडी धबधबा परिसरात रविवारी बुडालेल्या चार युवकांचे मृतदेह सोमवारी (ता. १३) अखेर शोधण्यात प्रशासनाला यश आले. मृतदेह बाहेर काढताच नातेवाइकांनी टाहो फोडल्याने परिसरातील वातावरण सुन्न झाले होते.
रविवारी (ता. १२) नाशिक येथून चार युवक पर्यटनासाठी वैतरणा धरण परिसरात आले होते.