नाशिक: लाडक्या गणरायाच्या स्वागतासह गणेशोत्सवाला बुधवार (ता. २७) पासून उत्साहात प्रारंभ होत आहे. शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शेकडो सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळांतर्फे ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यात ३१मौल्यवान गणपतींचा समावेश असून, यात मौल्यवान गणरायावर तब्बल ६८० किलोहून अधिक चांदी, लाखोंचे दागिने, अलंकार आहेत. दरम्यान, पोलिस ठाण्यांनी या मौल्यवान गणेश मंडळांना बंदोबस्त पुरविण्यासह मंडळ पदाधिकाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर उपाययोजनांच्या सूचना केल्या आहेत.