नाशिक- वन विभागाच्या ‘आयएफएस’ दर्जाच्या मराठी अधिकाऱ्यांना नियुक्ती करताना ज्येष्ठतेसह अनेक बाबी अनुकूल असतानाही डावलण्यात आल्याने राज्यभरात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत होती. यासंदर्भात ‘सकाळ’ने या अधिकाऱ्यांची कैफियत मांडत या प्रकारावर प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेत नागपूरच्या कार्यालयाने या सर्व २३ अधिकाऱ्यांना आठवडाभरात नियुक्ती दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, अन्याय झालेले सर्व अधिकारी मराठी आहेत.