Nashik : इंद्रनगरीमधील सभागृहाची तोडफोड | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

furniture of Rajmata Ahilyabai Holkar Hall in Indranagari was vandalized.

Nashik : इंद्रनगरीमधील सभागृहाची तोडफोड

सिडको (जि. नाशिक) : कामटवाडे भागातील इंद्रनगरी येथील राजमाता अहिल्याबाई होळकर सभागृहातील सामानाची अज्ञात समाजकंटकांनी नुकसान करत येथे मद्याच्या बाटल्या फोडल्याची घटना घडली. या ठिकाणी लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे वर्ग भरवले जातात. (Vandalism of auditorium in Indiranagar Nashik Latest Marathi News nashik)

हेही वाचा: Crime Update : घराचा कडीकोयंडा तोडून 37 हजारांचा ऐवज लंपास

गुरुवारी (ता. ११) अज्ञात समाजकंटकांनी याठिकाणी असलेले विजेचे बोर्ड तोडून मद्याच्या बाटल्या फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच शिवसेना विभागप्रमुख पवन मटाले यांनी याठिकाणी पाहणी करत अंबड पोलिसांना घटनेची माहिती दिली.

गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे आणि पथकाने परिसराची पाहणी करून संबंधित संशयितांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा: Crime Update : पांगरीत चोरट्यांकडून ATM फोडण्याचा प्रयत्न

Web Title: Vandalism Of Auditorium In Indiranagar Nashik Latest Marathi News Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..