वणी- दिंडोरी तालुक्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या दि. वणी मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँकेस २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक कोटी ४७ लाख ७१ हजार इतका ढोबळ नफा झाला आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही एनपीए (नॉन परफॉर्मिंग ॲसेट) शून्य टक्के राखण्यात बँकेला यश मिळाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष महेंद्र बोरा यांनी दिली.