government land
sakal
नाशिक
Wani News : वणी येथील शासकीय दूध योजना ११ वर्षांपासून बंद; मोक्याची जागा बनली 'मद्यपींचा अड्डा'
Vani Dairy and Ice Plant Closed for Over a Decade : वणीमधील शासकीय दूध योजना व बर्फ कारखाना ११ वर्षांपासून बंद असून परिसर भग्नावस्थेत आहे. अनैतिक कृतींचा अड्डा बनलेल्या जागेचा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करून विकास करण्याची मागणी केली जात आहे.
वणी: येथील नाशिक- कळवण- सापुतारा रस्त्यावरील शासकीय दूध योजना व बर्फ कारखाना अकरा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. योजनेची इमारत, बर्फ कारखाना, कर्मचारी निवासस्थाने, कार्यालयांची दुरवस्था झाली आहे. पडीक जागेवर झाडेझुडपे व अस्वच्छता वाढली आहे.
