Crime
sakal
वणी: पतीचे दारूचे व्यसन, सततची शिवीगाळ आणि मारहाणीचा त्रास या कारणांमुळे सात महिन्यांपासून माहेरी असलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या जावयाने, आपली अट मान्य करण्यास नकार दिल्याच्या रागातून मावस सासूवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना येथे घडली. हल्ला करून पळून जाणाऱ्या जावयास नागरिकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवारी घडली.