Nashik News : बाल्कनीसमोरून गेलेल्या विद्युत वाहीनीचा स्पर्श होताच तरुणाचा जागीच मृत्यू; वणी परिसरात शोकाकुल वातावरण!

Accidental Electric Shock : वणी येथील बिरसा मुंडा नगरात बाल्कनीसमोरून गेलेल्या विद्युत वाहीनीच्या तारेस स्पर्श झाल्याने १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककूल वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
outh Dies After Accidental Contact with Overhead Power Line in Vani

outh Dies After Accidental Contact with Overhead Power Line in Vani

sakal

Updated on

वणी (नाशिक) : वणी येथील बिरसा मुंडा नगरात बहीणीकडे आलेला युवक घराच्या बाल्कणीत उभा असतांना समोरुन गेलेल्या विद्युत वाहीनीच्या तारेस नकळतपणे हाताचा स्पर्श झाल्याने विजेचा जबर धक्का बसून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की वणी येथील बिरसा मुंडा नगर येथे सुमित वाळू निरगुडे (वय 19) रा. मावडी, ता. दिंडोरी हा आपल्या बहीणीच्या घरी आला होता. तो बुधवार ता. 3 रोजी संध्याकाळी नऊ वाजेच्या सुमारा घराच्या बाल्कनीमध्ये उभा असताना बाल्कनी समोरुनच गेलेली विद्युत वाहिनीची तार त्याच्या लक्षात न आल्याने नकळतपणे त्याच्या हाताच स्पर्श विजेच्या तारांना झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com