वणी: आदिवासी भागातील गर्भवती मातांची तपासणी व पोटाच्या विकाराच्या रुग्णांच्या तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात अडीच वर्षांपूर्वी नवीन सोनोग्राफी मशिन शासनाने उपलब्ध करून दिले. मात्र तंत्रज्ञच नसल्याने मशिन धूळखात पडले असून, गोरगरीब गर्भवती मातांची परवड होऊन खासगी सोनोग्राफीसाठी आर्थिक भुर्दंड बसत आहे. याबाबत येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी सोनोग्राफी तंत्रज्ञ (रेडिओलॉजिस्ट) उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे वैद्यकिय अधीक्षक डॉ. सोनाली गायधनी यांना निवेदन देत केली आहे.