

Fatal Collision on Vani-Saputara Route
sakal
वणी (नाशिक) : सापुतारा मार्गावर आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. यामध्ये हरिश्चंद्र राजहंस गायकवाड (वय 26) रा. घागबारी, ता. सुरगाणा हा जागीच ठार झाला. तसेच त्याच अज्ञात वाहनाने अन्य एका दुसऱ्या दुचाकीस धडक दिल्याने दुचाकी वरील सुमित दिनेश गायकवाड, वय 19 व दिव्या दिनेश गायकवाड वय 18 हे बहिण-भाऊ रा. पांडरपाडा, जि. डांग हे दोघे जखमी झाले आहे.