Wani Bus Stand
sakal
वणी: आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर जाण्यासाठी भाविकांची गर्दी दर वर्षी वाढत असून, सिंहस्थात ती आणखी वाढणार आहे. ही गर्दी थांबण्याचे महत्त्वाचे टप्पा असलेले वणी बसस्थानक व परिसरातील जागेचा वापर आगामी सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत वाहनतळासाठी होणार आहे. त्यादृष्टीने वणी बसस्थानकाचे नूतनीकरण व वाहनतळास काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याने आता बसस्थानकाचे रुपडे पालटणार आहे.