आंतरराष्ट्रीय रोलबॉल वर्ल्ड कपसाठी वंश त्रिवेदीची निवड

आंतरराष्ट्रीय रोलबॉल वर्ल्ड कपसाठी वंश त्रिवेदीची निवड
Published on: 
फोटो : 34528 नंदुरबार : वंश त्रिवेदी यांचा गौरव करताना ॲड. रमणलालभाई शाह, सचिव डॉ. योगेश देसाई, समन्वयक सुषमा शाह, मनीष शाह, पार्थ देसाई, प्राचार्य प्रशांत बागूल, उपमुख्याध्यापक भिकू त्रिवेदी. ------------ रोलबॉल वर्ल्ड कपसाठी वंश त्रिवेदीची निवड नंदुरबार, ता. ५ : श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल येथील रोलबॉल खेळाडू वंश त्रिवेदी याची आंतरराष्ट्रीय रोलबॉल वर्ल्ड कपच्या बेस कॅम्पसाठी निवड झाली. कोइंबतूर (तामिळनाडू) येथे नुकतीच राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा झाली. या स्पर्धेत विविध राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत वंशने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याची आंतरराष्ट्रीय रोलबॉल वर्ल्ड कपच्या बेस कॅम्पसाठी निवड झाली. ही चाचणी व प्रशिक्षण शिबिर १० ते १५ नोव्हेंबरदरम्या बेंगळुरू येथे होणार आहे. या कॅम्पमधून उत्कृष्ट खेळाडूंची पुढील स्पर्धेसाठी निवड होणार आहे. ही स्पर्धा डिसेंबरमध्ये इंदूर (मध्य प्रदेश) येथे होणार आहे. वंशचे सार्वजनिक शिक्षण समितीचे अध्यक्ष ॲड. रमणलाल शाह, सचिव डॉ. योगेश देसाई, समन्वयक सुषमा शाह, मनीष शाह, पार्थ देसाई, प्राचार्य प्रशांत बागूल, उपमुख्याध्यापक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षिका सीमा पाटील व पर्यवेक्षक सुनील शाह, नितीन देवरे यांनी अभिनंदन केले आहे. वंशला प्रशिक्षक नंदू पाटील, क्रीडाशिक्षक जगदीश वंजारी, मनीष सनेर, हेमचंद्र मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.