MSI26B09837
वाराणसी (उत्तर प्रदेश) : येथे आधुनिक आव्हानांसाठी प्राचीन ज्ञान तिसऱ्या जागतिक आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी उत्कर्ष देवरे.
------------------
वाराणसीतील जागतिक परिषदेत
देऊरच्या उत्कर्ष देवरेचा सहभाग
म्हसदी, ता. ८ : वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या ‘आधुनिक आव्हानांसाठी प्राचीन ज्ञान’ या तिसऱ्या जागतिक आंतरराष्ट्रीय परिषदेत देऊर बुद्रुक (ता. धुळे) येथील उत्कर्ष किरण देवरे याची निवड करण्यात आली होती.
वाराणसी येथील ताज गंगेज येथे झालेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील सुमारे दोनशे विद्वान, तत्त्वज्ञ, संशोधक, धोरणतज्ज्ञ सहभागी झाले होते. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने अदानी समूह आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उपाययोजना नेटवर्क यांच्या सहभागातून या परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेची यापूर्वीची दोन अधिवेशने ग्रीसमधील अथेन्स आणि चीनमधील बीजिंग येथे पार पडली होती. भारतात प्रथमच या परिषदेचे आयोजन वाराणसी येथे करण्यात आले. या व्यासपीठावर उत्कर्ष देवरे याला सहभागी होण्याची संधी मिळणे ही देऊर गावासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. उत्कर्ष हा वामनराव धवळू देवरे यांचा नातू, तर कलाशिक्षक किरण वामनराव देवरे यांचा मुलगा आहे.