MUHS Election : आरोग्य विद्यापीठाची शुक्रवारी विविध प्राधिकरण निवडणूक

MUHS latest marathi news
MUHS latest marathi newsesakal

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनियमानुसार विद्यापीठ अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळे आदी प्राधिकरणांसाठी येत्या शुक्रवारी (ता. १७) निवडणूक होत आहे.

या प्रक्रियेत अधिसभेसाठी (सिनेट) मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती व नाशिक विभागातील प्रत्येकी एक याप्रमाणे सहा प्राध्यापक, तसेच प्रत्येक विद्याशाखेतून एक याप्रमाणे वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखांमध्ये मतदान घेतले जाईल. (Various Authority Election of MUHS on Friday nashik news)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

MUHS latest marathi news
Weather Forecast : जिल्ह्यात पुन्हा वादळी अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला अलर्ट!

त्यातून अधिसभेसाठी पाच प्राध्यापक वगळता शिक्षक निवडले जातील. विद्या परिषदेसाठी प्राचार्य, अधिष्ठाता यांच्यामधून प्रत्येक विद्याशाखेमधून प्रत्येकी एक याप्रमाणे वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखेतील प्राचर्यांसाठी मतदान घेतले जाईल.

तर प्रत्येक अभ्यास मंडळासाठी सहा विभागप्रमुख याप्रमाणे १८ विविध (पदवी व पदव्युत्तर एकत्रित) अभ्यास मंडळांकरिता वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिंग आणि फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपीसाठी निवडणूक घेतली जाईल. विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी ही माहिती दिली.

MUHS latest marathi news
Biogas Project : बायोगॅस प्रकल्पाच्या कामाला अखेर लाभले मुहूर्त; सिव्हिल वर्कसाठी खोदकामाला प्रारंभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com